भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर अखेर भाजपमध्ये दाखल - Ravi Shankar Prasad
दिल्लीतून गंभीर लोकसभेची निवडणूकही लढवण्याचीही शक्यता
Gautam Gambhir
दिल्ली - भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने अखेर आज भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. दिल्लीतून गंभीर भाजपसाठी लोकसभेची निवडणूक लढवण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.अरुण जेटली आणिरविशंकर प्रसादयांच्याप्रमुख उपस्थित गंभीरने भाजपमध्ये प्रवेशकेला.
दिल्लीत आम आदमी पक्षाविरोधात तगडे आव्हान उभे करण्यासाठी भाजप गौतम गंभीरचा वापर करेल. गेल्या काही काळात गौतम अनेकवेळा सरकारने घेतलेल्या निर्णयांचेसमर्थन करताना दिसला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने धोनीच्या नेतृत्वात जिंकलेल्याटी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकात गंभीरने भारतीय संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली होती. गेल्या वर्षी डिंसेबरला गंभीरने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Last Updated : Mar 22, 2019, 12:45 PM IST