महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर बेदी यांच्यावर बायपास सर्जरी; जाणून घ्या अपडेट - bishan singh bedi hospitalized

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांच्यावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात बायपास सर्जरी करण्यात आली आहे. सद्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

former indian captain and spin legend bishan singh bedi undergoes bypass surgery
भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर बेदी यांच्यावर बायपास सर्जरी; जाणून घ्या अपडेट

By

Published : Feb 23, 2021, 8:14 PM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांच्यावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात बायपास सर्जरी करण्यात आली आहे. सद्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे त्यांना लवकरच रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे.

बिशन सिंग बेदी यांच्या जवळच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, बिशन सिंग यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली असून लवकरच बिशन सिंग यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे.

बेदी यांच्या निकटवर्तीयाने पीटीआयला त्यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'जिथं पर्यंत मला माहिती आहे, बेदींना हृदयासंबंधी त्रास होता. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार २-३ दिवसांपुर्वी त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली. यानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे आशा आहे की, त्यांना लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळेल.'

दरम्यान, बेदी यांनी भारताकडून ६७ कसोटी आणि १० एकदिवसीय सामने खेळली आहेत. यात कसोटीत २६६ तर एकदिवसीय सामन्यात ७ गडी बाद केले आहेत.

हेही वाचा -'तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट', नटराजनने शेअर केला लेकीसोबतचा फोटो

हेही वाचा -IND vs ENG: डे-नाइट कसोटीत प्रथमच भारत आणि इंग्लंड आमने-सामने; गुलाबी चेंडूवर अग्निपरीक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details