मुंबई -माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि मुंबई संघाचा मुख्य निवडकर्ता सलिल अंकोलाला कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून सलिलने याची माहिती दिली.
भारताकडून १ कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळलेला सलिल म्हणाला, "उद्या माझा वाढदिवस आहे आणि आज मी कोरोनाच्या कचाट्यात सापडलो आहे. कधीही विसरता न येणारा वाढदिवस. या परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटते पण मला प्रत्येकाच्या प्रार्थनेची गरज आहे. पूर्ण शक्तीने मी परत येईन."