हैदराबाद - भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बापू यांच्या निधनानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
सचिनने, बापू तुमच्या २१ निर्धाव षटकांची गोष्ट ऐकून मी मोठा झालो आहे, या आशयाचे ट्विट केलं आहे. माझ्या सद्भभावना नाडकर्णी कुटुंबासोबत आहेत. बापू नाडकर्णी यांना आदरांजली. असंही सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये म्हटले आहे.
माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते मृत्यूसमयी ८६ वर्षांचे होते. पत्नी व दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. बापू यांनी खास गोलंदाजीच्या शैलीमुळे क्रिकेटविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण झाली होती.