लंडन - इंग्लंडचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सर इयान बोथम यांचे नाव प्रतिष्ठित हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये जोडले जाणार आहे. ग्रेट ब्रिटन सरकारने त्यांना 'लाइफ पीरेज' पुरस्कार जाहीर केला आहे. एका वृत्तानुसार, हा पुरस्कार मिळालेल्या 36 लोकांमध्ये बोथम यांचे नाव आहे.
हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या या पुरस्काराच्या यादीत चान्सलर केन क्लार्क आणि फिलिप हॅमंड यांचा देखील समावेश आहे. 2011 पासून हा पुरस्कार मिळवणारे बोथम हे पहिले क्रिकेटपटू आहेत. यापूर्वी राचेस फ्लिंट, डेव्हिड शेफर्ड, कोलिन काउड्रे आणि लियार कॉन्स्टँटाईन यांना हा पुरस्कार मिळाला आहे.