महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंग्लंडचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू पीटर वॉकर यांचे निधन

मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज आणि डावखुरा स्विंग गोलंदाज म्हणून पीटर वॉकर 1956 मध्ये संघात सामील झाले. 1959 मध्ये त्यांनी दीड हजार धावांचा टप्पा पार केला.

Former England all-rounder Peter Walker dies aged 84
इंग्लंडचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू पीटर वॉकर यांचे निधन

By

Published : Apr 6, 2020, 7:44 PM IST

लंडन -इंग्लंड आणि ग्लॅमरगन काउंटी क्रिकेट क्लबचे अष्टपैलू क्रिकेटपटू पीटर वॉकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे. वॉर्कर यांचा ब्रिस्टलमध्ये जन्म झाला. मर्चंट नेव्हीमध्ये काही वर्षे घालविण्यापूर्वी ते दक्षिण आफ्रिकेत होते.

जोहान्सबर्गमधील एका शाळेत वॉकर यांना वॉटकिन्स आणि इतर ग्लॅमरगॉन खेळाडूंनी प्रशिक्षिण दिले. त्यानंतर, वॉकर यांनी जुन्या प्रशिक्षकांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला.

मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज आणि डावखुरा स्विंग गोलंदाज म्हणून ते 1956 मध्ये संघात सामील झाले. 1959 मध्ये त्यांनी दीड हजार धावांचा टप्पा पार केला. 1960 च्या दशकात ते ग्लॅमरगॉन संघाचे अविभाज्य सदस्य ठरले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details