चेन्नई - भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सलामी फलंदाज व्ही. बी. चंद्रशेखर यांचे गुरुवारी ह्रदयविकारांच्या झटक्याने निधन झाले. तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए) अधिकाराऱ्यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. चंद्रशेखर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. आक्रमक फलंदाज असलेल्या चंद्रशेखर यांनी सात एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले.
भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. बी. चंद्रशेखर यांचे निधन - प्रथम श्रेणीच्या सामने
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सलामी फलंदाज व्ही. बी. चंद्रशेखर यांचे गुरुवारी ह्रदयविकारांच्या झटक्याने निधन झाले.

व्ही. बी. चंद्रशेखर १९८७-८८ मध्ये दोन वेळा रणजी ट्रॅाफी जिंकणारे तमिळनाडू क्रिकेट संघाचे ते सदस्य होते. त्यांनी उत्तर प्रदेश विरुध्द झालेल्या सामन्यात उपांत्य फेरीत १६० रन आणि रेल्वे विरुध्द अंतिम सामन्यांत ८९ धावा केल्या होत्या. व्ही. बी. चंद्रशेखर यांनी १९८८ ते १९९० मध्ये त्यांनी सात वनडे खेळले होते. त्या सामन्यात त्यांनी ८८ धावा केल्या होत्या. एकदिवसीय सामन्यांत त्यांच्या नावे एक अर्धशतक आहे.
चंद्रशेखरांनी ८१ प्रथम श्रेणीच्या सामन्यांत ४ हजार ९९९ धावा केल्या आहेत. यामध्ये नाबाद २३७ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. ते आईपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे क्रिकेट मॅनेजर होते.