मुंबई - आगामी विंडीज दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली. या दौऱ्यासाठी विराटला कर्णधारपद देण्यात आले आहे. या निवडीबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली मात्र नाराज आहे. यावर दादाने निवड समितीला सूचक इशारा दिला आहे.
'सर्वांना खुश करण्याऐवजी देशासाठी सर्वोत्तम खेळाडू निवडा', दादाचा सूचक इशारा - team india
गांगुलीने आपल्या ट्विटमध्ये अजिंक्य रहाणे आणि शुभमन गिलबद्दल मत व्यक्त केले आहे.
गांगुलीने आपल्या ट्विटमध्ये अजिंक्य रहाणे आणि शुभमन गिलबद्दल मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, 'अजिंक्य रहाणे कसोटी संघाचा उपकर्णधार आहे, परंतु तो वन डे संघात असायला हवा होता. शिवाय भारत 'अ' संघाच्या विंडीज दौऱ्यात शुभमनने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यालाही वन डे संघात स्थान मिळायला हवे होते'.
दादा पुढे म्हणाला, 'तीनही प्रकारच्या संघात समान खेळाडू निवडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खेळाडूंना सातत्य राखता येईल. आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. सध्याच्या घडीला फार कमी खेळाडू तीनही संघात खेळत आहेत. सर्वांना खूश करण्याच्या प्रयत्न न करता देशासाठी चांगले खेळाडू निवडा.'