नवी दिल्ली - क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने आपल्या 'विश्वकरंडक ड्रीम इलेव्हन'ची निवड केली आहे. वॉर्नने आपल्या या ड्रीम इलेव्हन संघात भारताकडून फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला स्थान दिले आहे.
वॉर्नच्या या संघात सर्वाधिक ४ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा समावेश केला आहे. तर त्यापाठोपाठ पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या २-२ खेळाडूंचा समावेश केलाय. आफ्रिदिने आपल्या या संघात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एकाही खेळाडूचा समावेश केलेला नाहीय.