नवी दिल्ली -पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने त्याच्या कारच्या संग्रहात बुगाटी सॅंटोडीसी नावाची आणखी एक कार जोडली आहे. ही कार मर्यादित संख्येने उपलब्ध आहे. रोनाल्डोने आपल्या नवीन कारसह इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. "तू देखावा निवड", असे त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
रोनाल्डोने घेतली जगातील सर्वात महागडी कार! - ख्रिस्तियानो रोनाल्डो लेटेस्ट न्यूज
रोनाल्डोच्या या नव्या कारची किंमत 75 कोटी इतकी आहे. रोनाल्डोच्या कार कलेक्शनबद्दलही त्याचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. रोनाल्डोकडेही मोठ्या किंमतीच्या कार आहेत. ज्यामध्ये फेरारी, लम्बोर्गिनी, मॅक्लॉरेन आर्मी सारख्या मोटारींचा समावेश आहे. या नव्या कारबद्दल चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
![रोनाल्डोने घेतली जगातील सर्वात महागडी कार! football legend cristiano ronaldo owns the most expensive car of the world](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8287144-196-8287144-1596522230283.jpg)
रोनाल्डोच्या या नव्या कारची किंमत 75 कोटी इतकी आहे. रोनाल्डोच्या कार कलेक्शनबद्दलही त्याचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. रोनाल्डोकडेही मोठ्या किंमतीच्या कार आहेत. ज्यामध्ये फेरारी, लम्बोर्गिनी, मॅक्लॉरेन आर्मी सारख्या मोटारींचा समावेश आहे. या नव्या कारबद्दल चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
रोनाल्डोचा क्लब जुव्हेंटसने अलीकडेच सेरी-ए लीगचे विजेतेपद जिंकले आहे. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी या विजेतेपदाबद्दल इटालियन क्लब जुव्हेंटसचे अभिनंदन केले आहे. त्यांनी रोनाल्डोला 'मॉडर्न अॅथलीट' असेही संबोधले. 35 वर्षीय रोनाल्डोने या हंगामात जुव्हेंटसकडून 32 सामन्यांत 31 गोल केले आहेत.