नवी दिल्ली -भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटपासून २ महिने विश्रांती घेतल्यानंतर नव्या इनिंगला सुरुवात केली. धोनी १०६ टेरिटॉरियर आर्मी बटालियनचा सदस्य (पॅरा) असून तो ३१ जुलै पासून बटालियनच्या जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत आहे. धोनी आता अजून एक अंदाजात दिसणार आहे. या स्वातंत्र्यदिनी तो लेह येथे तिरंगा फडकावणार आहे.
या स्वातंत्र्यदिनी लेफ्टनंट धोनी फडकवणार लेहमध्ये तिरंगा - महेंद्रसिंह धोनी
२०११ साली भारतीय सेनेने धोनीला लेफ्टनंट कर्नलचा सन्मान दिला होता.
सैन्याच्या एका अधिकाऱ्याने म्हटले, 'भारतीय सैन्याचा धोनी ब्रँड अँम्बॅसडर आहे. तो आपल्या युनिटच्या सर्व सहकाऱ्यांना नेहमी प्रेरित करत असतो. तो नेहमी जवानांबरोबर फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळत असतो. आणि तो सर्वांसोबत सरावही करतो. धोनी १५ ऑगस्टपर्यंत थांबणार आहे.'
२०११ साली भारतीय सेनेने धोनीला लेफ्टनंट कर्नलचा सन्मान दिला होता. धोनीशिवाय, अभिनव बिंद्रा आणि दीपक राव यांनाही हा सन्मान देण्यात आला होता. २०१५ साली धोनीने याचे प्रशिक्षणही घेतले आणि पॅराट्रुपरची पात्रता मिळवली. आग्रा येथील प्रशिक्षण केंद्रावर सेनेच्या विमानातून धोनीने ५ वेळा विमानातून उडी घेतली होती.