पणजी - संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सामन्यांवरील सट्टेबाजीसाठी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गोवा बीच व्हिला येथे छापा टाकून राजस्थानच्या चार आणि एका नेपाळी नागरिकास अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
आयपीएल सट्टेबाजी : गोव्यात पाच जणांना अटक - आयपीएल २०२० गोवा बेटिंग अटक
यूएईत सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांतील सट्टेबाजीप्रकरणी गोव्यातून पाच जणांना अटक करण्यात आली. यात एका नेपाळी नागरिकास ताब्यात घेण्यात आले आहे.
आयपीएल सट्टेबाजी : गोव्यात पाच जणांना अटक
अटक केलेल्यांमध्ये राजू सिंग (२५), मोहित कुमार (२१), रवी ममतानी (३०) आणि सागरसिंग राठौर (२८) यांचा समावेश आहे. हे सर्व राजस्थानचे आहेत. या छाप्यादरम्यान एका नेपाळी नागरिकासही अटक करण्यात आली आहे. सूरज सोनी (२८) असे या नेपाळी नागरिकाचे नाव आहे.
या पाच जणांकडून ९५ हजार रुपयांची रोकड, नऊ मोबाईल फोन, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. गोवा पब्लिक जुगार कायद्यांतर्गत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.