मेलबर्न -सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट टीमचे पाच खेळाडू एका हॉटेलमध्ये बसलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी भारतीय खेळाडू एका रेस्टॉरंटमध्ये बसल्यानंतर करण्यात आला होता.
भारतीय टीमचे खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी या खेळाडूंना संघाच्या अन्य खेळाडूंपासून वेगळे करण्यात आले आहे. हा पाच खेळाडू सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. ही माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी रात्री दिली.