महाराष्ट्र

maharashtra

ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत 'हे' ठरले विजयाचे शिल्पकार

By

Published : Nov 24, 2019, 5:34 PM IST

भारतीय वेगवान त्रिकुट ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी बांगलादेशचा प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरवला. तिघांच्या माऱ्यासमोर बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय संघाने आपला डाव ३४७ धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावातही भारतीय वेगवान माऱ्यासमोर बांगलादेशचा संघ १९५ धावांच करु शकला आणि भारताने हा सामना एक डाव ४६ धावांनी जिंकला. वाचा कोण आहेत गुलाबी सामन्यांच्या विजयाचे ५ हिरो...

ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी विजयात 'हे' ठरले विजयाचे शिल्पकार

कोलकाता - भारतीय संघाने बांगलादेश विरुध्दचा ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना १ डाव आणि ४६ धावांनी जिंकला आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले. याच दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वलस्थान अधिक बळकट केले आहे.

दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय वेगवान त्रिकुट ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी बांगलादेशचा हा निर्णय चुकीचा ठरवला. तिघांच्या माऱ्यासमोर बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय संघाने आपला डाव ३४७ धावा करुन घोषित केला. दुसऱ्या डावातही भारतीय वेगवान माऱ्यासमोर बांगलादेशचा संघ १९५ धावांच करु शकला आणि भारताने हा सामना एक डाव ४६ धावांनी जिंकला. वाचा कोण आहेत गुलाबी सामन्यांच्या विजयाचे ५ हिरो...

विराट कोहली -
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात १८ चौकाराच्या मदतीने १३६ धावांची दणकेबाज खेळी केली. त्याचं हे २७ वं कसोटी क्रिकेट शतक ठरलं. या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघ पहिल्या डावात ३४७ धावा करु शकला.

विराट कोहली....

ईशांत शर्मा -
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने दुसऱ्या आणि ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत भेदक गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात ९ गडी बाद केले. पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ४ गडी बाद करुन त्याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. महत्वाचे म्हणजे, दिवस-रात्र कसोटीत ईशात भारताकडून पहिला गडी, पहिले निर्धाव षटक आणि पहिला चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला.

ईशांत शर्मा....

उमेश यादव -
ईशांत शर्मासोबत उमेश यादवनेही या कसोटीत शानदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात एकूण ८ गडी बाद केले. पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ५ गडी बाद करत त्याने बांगलादेश विरुध्दच्या कसोटी विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.

उमेश यादव...

अजिंक्य रहाणे -
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने पहिल्या डावात फलंदाजी करताना ६९ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. अजिंक्यचे आंतरराष्ट्रीय दिवस-रात्र कसोटीतील हे पहिलेच अर्धशतक ठरले.

अजिंक्य रहाणे...

चेतेश्वर पुजारा -
पहिल्या डावात फलंदाजी करताना पुजाराने ५५ धावांची खेळी केली. त्याने १०५ चेंडूचा सामना करताना ही खेळी साकारली. विराट, रहाणे आणि पुजारा यांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३४७ धावा केल्या.

चेतेश्वर पुजारा....

ABOUT THE AUTHOR

...view details