मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २४० धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर गडगडला. भारतीय संघाचे ४ मोहरे पहिल्या ४० धावांतच माघारी परतले आहेत. सलामीवार रोहित शर्मा, लोकेश राहूल आणि कर्णधार विराट कोहली हे तिघेही फक्त प्रत्येकी १ धावा करुन माघारी परतले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या आघाडीच्या फळीतले तिन्ही फलंदाज एक धाव काढून माघारी परतण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
भारतीय फलंदाजाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम; वाचा काय आहे ते... - virat kohli
न्यूझीलंड विरुध्द सलामीवार रोहित शर्मा, लोकेश राहूल आणि कर्णधार विराट कोहली हे तिघेही फक्त प्रत्येकी १ धावा करुन माघारी परतले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या आघाडीच्या फळीतले तिन्ही फलंदाज एक धाव काढून माघारी परतण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
भारतीय फलंदाजाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम; वाचा काय आहे ते...
न्यूझीलंडचे २४० धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का मॅट हेन्रीने रोहितच्या रुपाने दिला. त्यानंतर ट्रेंट बोल्टने कर्णधार विराट कोहलीला पायचित करत माघारी पाठवले. हे दोन धक्के बसलेले असताना, पुन्हा सलामीवीर लोकेश राहुलला टॉम लॅथमकरवी झेलबाद करत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले.