नवी दिल्ली - कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फलंदाज रिंकू सिंग याला बीसीसीआयने निलंबीत केले आहे. दुबईतील एका टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळल्यामुळे रिंकूला निलंबित करण्यात आले.
केकेआरचा खेळाडू रिंकू सिंगने केला 'हा' प्रकार अन् बीसीसीआयने केले निलंबित - India A
दुबईतील एका टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळल्यामुळे रिंकूला निलंबित करण्यात आले.
रिंकू सिंग
मुख्य म्हणजे ही स्पर्धा मान्यताप्राप्त नव्हती. शिवाय रिंकूने या स्पर्धेत खेळण्यासाठी बीसीसीआयची परवानगी घेतली नव्हती. या परवानगीशिवाय बीसीसीआयशी संलग्न असलेल्या कोणत्याही खेळाडूला इतर स्पर्धेत खेळता येत नाही. त्यामुळे नियमाचा भंग केल्यामुळे रिंकूवर ३ महिन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली.
उत्तर प्रदेशमधील रिंकू हा भारत 'अ' संघाचा खेळाडू आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून त्याला वगळण्यात आले आहे. रिंकूवर लागलेली बंदी १ जून २०१९ पासून सुरू होईल.