नवी दिल्ली -टीम इंडियाचा कर्णधार विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये विराटच्या नावाचे स्टँड होणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाने (डीडीसीए) हा निर्णय घेतला आहे.
डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी विराटच्या या निर्णयाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, 'जागतिक क्रिकेटमध्ये विराटच्या कर्तृत्वामुळे डीडीसीएचा गौरव झाला आहे. मोठे विक्रम आणि उत्कृष्ठ नेतृत्वामुळे आम्हाला त्याला हा सन्मान देताना आनंद होत आहे.'