महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगवर एफआयआर दाखल

युवराज रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ चॅट करत होता. यात त्याने मस्करीत युझवेंद्र चहलविरोधी जातीवाचक शेरेबाजी केली. त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी माग' असा ट्रेंडही व्हायरल झाला होता.

युवराज सिंग
युवराज सिंग

By

Published : Feb 15, 2021, 10:22 AM IST

Updated : Feb 26, 2021, 12:01 PM IST

चंदीगड - माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगविरोधात हरयाणा पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. मागील वर्षी रोहित शर्माशी 'इन्स्टाग्राम'वर साधलेल्या संवादादरम्यान युवराजने मस्तीच्या भरात चहलला उद्देशून जातीवाचक शब्द उच्चारले होते. हिसारच्या हांसी पोलीस स्टेशनमध्ये रविवारी ही एफआयआर नोंदविण्यात आली आहे.

कलम १५३, १५३ ए, २९५, आयपीसीच्या५०५, एससी/एसटी कायद्याचेस कलम ३(१) (आर) आणि ३(१) (एस) ही कलमे युवराजवर लावण्यात आली आहेत. हिसारमधील वकिलाने तक्रार दिल्यानंतर आठ महिन्यांनी एफआयआर दाखल झाली आहे. ''माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो'', असे युवराजने या तक्रारीनंतर म्हटले होते.

काय आहे प्रकरण -

युवराज रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ चॅट करत होता. यात त्याने मस्करीत युझवेंद्र चहलविरोधी जातीवाचक शेरेबाजी केली. त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी माग' असा ट्रेंडही व्हायरल झाला होता.

यानंतर युवीने आपली बाजू मांडली. ''माझा कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास नाही. धर्म, रंग, पंथ किंवा लिंग यावरून मी कधीच भेदभाव करत नाही. लोकांचे कल्याण करण्यासाठी मी झटत आलो आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा मी आदर राखतो. मला जातीवाचक टीका टिप्पणी करण्यात काहीही रस नाही. रोहितशी झालेल्या त्या संवादादरम्यान माझ्या शब्दांचा उलट अर्थ काढण्यात आला. परंतु माझ्या या कृत्यामुळे चहलव्यतिरिक्त अन्य कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो'', असे युवराजने ट्विट केले होते.

युवराज आणि क्रिकेट -

१२ डिसेंबर १९८१ रोजी चंदीगढमध्ये युवराजचा जन्म झाला. टी-२० क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा विक्रम युवीच्या नावे आहे. युवीने टी-२० क्रिकेटमध्ये तर आपली छाप सोडलीच पण त्याआधी त्याने एकदिवसीय सामन्यात अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. युवराजने भारताकडून ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ८७०१, १९००, ११७७ धावा केल्या आहेत.

हेही वाचा - आयपीएल लिलावापूर्वी सचिनच्या पोराचा मुंबईत कहर!

Last Updated : Feb 26, 2021, 12:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details