मुंबई - क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी जीव की प्राण. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच भारतात गल्लोगल्ली क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जातात. सद्या युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. अशात कोल्हापुरात आयपीएलच्या टीम चाहत्यांमध्ये धोनी आणि रोहित शर्मा यांच्यावरुन हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. पण या घटनेबद्दल दुजोरा मिळालेला नाही. उलट हे वृत्त चुकीचे असल्याचे कळते. या प्रकरणावर भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने आपले मत व्यक्त केले आहे.
काय आहे प्रकरण -
कोल्हापूरच्या कुरुंदवाड शहरात फलक लावण्यावरुन रोहितच्या चाहत्यांनी धोनीच्या चाहत्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी ऊसाच्या शेतात नेऊन शिवीगाळ देणाऱ्यास मारहाण केली. असे वृत्त माध्यमांनी दिले. पण हे वृत्त निराधार असल्याचे समजते. या प्रकरणी त्या चाहत्यांनी धोनी व रोहित शर्मा यांचे फलक लावण्यासाठी नगरपालिकेतून रीतसर परवाना घेतला असल्याचे सांगत मारहाण प्रकरण घडलेच नाही, असे सांगितले आहे.