मुंबई - मेलबर्नमधील ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचा भारतीय संघात दबदबा वाढला आहे. बॉक्सिंग डे कसोटीत त्याने आपल्या कुशल नेतृत्वाची झलक दाखवताना, गोलंदाजीत योग्य ते बदल केले. याशिवाय त्याने, संघ अडचणीत असताना, कर्णधाराला साजेशी खेळी करत शतक झळकावले. यादरम्यान, 'ईटीव्ही भारत'ने अजिंक्यचे प्रशिक्षक प्रविण आमरे यांच्याशी बातचित केली. यात आमरे यांनी काय सांगितलं वाचा...
अजिंक्यचे प्रशिक्षक आणि भारताचे माजी खेळाडू प्रविण आमरे यांच्या चर्चेतील काही मुख्य बाबी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात...
- दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्यचे नेतृत्व कसे राहिले?
मेलबर्न कसोटी सामना मालिकेतील महत्वपूर्ण होता. कारण पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघ पिछाडीवर होता. अशात संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघाबाहेर होते. यामुळे अडचणीत वाढ झाली होती. सर्वजण भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची आपेक्षा करत होते. कोणलाही दुसरा सामना जिंकू असे वाटले नव्हते. पण सर्वांना उत्सुकता होती की, भारतीय संघ वापसी कशी करणार. अजिंक्यच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्व आघाड्यावर चांगली कामगिरी केली. अजिंक्यने गोलंदाजीत योग्य वेळी योग्य बदल केले. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना जिंकला. यावर मी खूश आहे.
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रहाणेची कामगिरी खास नव्हती. यामुळे त्याला आणि पुजाराला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळले पाहिजे, अशी टीका होत होती. यामुळे दोघेही दबाबात होते. यावर तुम्ही काय सांगाल?
जेव्हा तुम्ही सहा सात वर्षाहून अधिक वेळ क्रिकेट खेळता. तेव्हा तुम्ही आपला फॉर्म कायम ठेऊ शकत नाही. फॉर्म कधी चांगला राहतो. तर कधी खराब होते. ही सामान्य बाब आहे. पण मला वाटत की दोघेही निर्धास्त होते. त्यांनी असे अनेक चढउतार पाहिले आहेत. न्यूझीलंड दौऱ्यात त्यांनी अनेक गोष्टी शिकल्या आहेत. त्यांना काही बाबतीत सुधारण्याची गरज होती. ती सुधारणा त्यांनी केली आहे.
- कर्णधारपदामुळे अजिंक्य रहाणेवर अधिक जबाबदारी आली आहे. यावर तुम्ही काय सांगाल?