हैदराबाद -इंडियन प्रिमियर लीगच्या बाराव्या मोसमात राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा भारताचा युवा क्रिकेटपटू संजू सॅमसनच्या मते राजस्थानचा संघ या मोसमात सर्वात मजबूत संघ आहे. सॅमसन म्हणाला की, यावर्षी आमचा संघ सर्वच क्षेत्रात चांगला असल्याने राजस्थानचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.
EXCLUSIVE : 'राजस्थान रॉयल्स टॉप-4 मध्ये पोहचणारच' - India Premier League
राजस्थानचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनची 'ETV'शी खास बातचीत
भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना संजू म्हणाला की, भारतासाठी क्रिकेट खेळणे सोपी गोष्ठ नाही. त्यासाठी खुप मेहनत करावी लागते, मी जर माझा सर्वोत्तम खेळ केला तर मी कोणत्याही संघासाठी खेळू शकतो. मी जेवढे सामने खेळणार आहे, त्या सर्व सामन्यांमध्ये मी माझ्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, असेही तो म्हणाला.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात १ हजार धावा करणाऱ्या संजूने भारतीय क्रिकेट संघासाठी १ अंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला आहे. तर आयपीएलमध्ये खेळताना त्याने ८२ सामन्यांमध्ये १ हजार ८९७ धावा केल्या आहेत.