मुंबई- भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज वसिम जाफरने आज (शनिवार) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. वसिमने प्रथम श्रेणीमध्ये २० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. तो रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.
जाफरला रणजीचा सचिन तेंडुलकर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विक्रम केला. तर जाफरने 'डोमेस्टिक क्रिकेट'मध्ये २० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. ४१ वर्षीय जाफर १५० रणजी सामने खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
निवृत्तीची घोषणा करताना जाफर म्हणाला, 'माझ्या वडिलांची इच्छा होती की मी भारतासाठी खेळावं. ती इच्छा मला पूर्ण करता आली याचा मला आनंद आहे.'
जाफरने बीसीसीआय, मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे संधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच त्याने सचिन तेंडुलकर राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंह धोनी या दिग्गजांसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे म्हटलं.
१० रणजी 'फायनल' खेळला, सर्वच्या सर्व जिंकला..!