कोलकाता - 2020 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सध्या खेळाडूंचे लिलाव सुरू आहेत. आत्तापर्यंत लिलावात परदेशी खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची किंमत मिळाली आहे. इंग्लंडच्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार इयान मॉर्गन याला कोलकाता नाईटराइडर्सने 5.25 कोटी रुपये मोजून आपल्या चमूमध्ये दाखल करून घेतले आहे.
1.5 कोटी बेस प्राईज असलेल्या मॉर्गनला खरेदी करण्यासाठी कोलकाता नाईटराइडर्स आणि दिल्ली कॅपीटल्समध्ये चुरस होती. मात्र, शेवटी नाईटराइडर्सने बाजी मारली. विशेष म्हणजे आयपीएलच्या मागच्या दोन हंगामात इयन मॉर्गनला कोणीही खरेदी केले नव्हते. यावर्षी मात्र, मॉर्गनला सव्वापाच कोटींची घसघशीत किंमत मिळाली आहे.