लंडन - विश्वकरंडकात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला यांच्यात खेळल्या जात असलेल्या सलामिच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने एक नवा इतिहास रचला आहे. मॉर्गनने इंग्लंडसाठी खेळलेला हा २००वा एकदिवसीय सामना असून अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
विश्वकरंडकाच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने रचला इतिहास
२००वा एकदिवसीय सामना खेळणारा इयॉन मॉर्गन हा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे
इयॉन मॉर्गन
डबलिनमध्ये जन्मलेल्या मॉर्गनने २००६ साली स्कॉटलंडविरुद्ध पहिला सामना खेळला होता. त्यानंतर त्याने एकूण २२ सामन्यात आयर्लंडसाठी खेळलेत. त्यानंतर तो इंग्लंडसाठी खेळू लागला. मॉर्गन आज दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आपला २०० वा वनडे सामना खेळला. इंग्लंडकडून यापूर्वी पॉल कॉलिंगवुडने १९७ तर जेम्स अँडरसन १९४ वनडे सामने खेळले आहेत.
इंग्लंडकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारे खेळाडू
- इयॉन मॉर्गन २००* सामने
- पॉल कॉलिंगवूड १९७ सामने
- जेम्स अँडरसन १९४ सामने
- ऍलेक स्टिवर्ट १७० सामने
- इयान बेल १६१ सामने