महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पंजाबला विजय मिळवून दिल्याने मी अतिशय आनंदी - लोकेश राहुल - Kings XI Punjab

राहुलने केलेल्या तडाखेबंद फलंदाजीमुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले

लोकेश राहुल

By

Published : Apr 9, 2019, 3:18 PM IST

मोहाली -सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने ६ विकेट राखून रोमांचक विजय मिळवला. पंजाबकडून सलामीवीर लोकेश राहुलने ५३ चेंडूत नाबाद ७१ धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राहुलने केलेल्या तडाखेबंद फलंदाजीमुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकेश राहुल


सामना संपल्यानंतर राहुल म्हणाला की, सामना संपवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि आतापर्यंत ही स्पर्धा माझ्यासाठी चांगली नव्हती. अशा परिस्थितीत मी दडपणाखाली होतो, मात्र तरीही मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेतला आणि संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी झालो. त्यामुळे मी अतिशय आनंदीत असल्याचे राहुल म्हणाला.


मोहालीच्या आय.एस बिंद्रा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला निर्धारीत २० षटकात ४ गडी गमावत १५० धावा केल्या होत्या. सनरायझर्सने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला सुरुवातीलाच गेलच्या रुपात मोठा धक्का बसला मात्र, लोकेश राहुल (७१) आणि मयांक अग्रवाल (५५) यांनी केलेल्या संयमी खेळीमुळे पंजाबने अखेरच्या षटकामध्ये १ चेंडू बाकी असताना रोमहर्षक विजय मिळवला.

ABOUT THE AUTHOR

...view details