लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत तीन पराभव झाल्याने यजमान इंग्लड संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा धुसर झाल्या आहेत. मात्र मंगळवारी ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतरही इंग्लडचा खेळाडू बेन स्टोक्सने 'हा विश्वकरंडक आमचाच' असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर उपांत्य फेरीचा मार्ग खडतर बनला आहे.
विश्वकरंडक स्पर्धेत धमाकेदार सुरूवात करुन इंग्लड संघाने आपण विश्वविजेतेपदाचे दावेदार असल्याचे म्हटले होते. मात्र, या स्पर्धेत इंग्लडला तीन पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लडला पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघानी पराभव केला आहे. तीन पराभवानंतरही इंग्लडचा खेळाडू बेन स्टोक्स विश्वकरंडक आमचाच असल्याचे म्हणाला.