दुबई - इंग्लंडच्या सरे काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळताना विल जॅक्स या २० वर्षीय खेळाडूने अवघ्या २५ षटकात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. जॅक्सने दुबईत खेळल्या जात असलेल्या टी-१० तिरंगी मालिकेत लँकशायर क्रिकेट क्लबविरुद्ध खेळताना ही वादळी केली.
इंग्लंडच्या या २० वर्षीय खेळाडूने २५ चेंडूत झळकावले 'शतक' - against
एकाच ओव्हरमध्ये खेचले ६ षटकार
खेळल्या गेलेल्या या सामन्यात जॅक्सने ३० चेंडूत १०५ धावांची खेळी केली. त्याच्या धमाकेदार खेळीत ११ षटकार आणि ८ चौकांराचां समावेश होता. तसेच जॅक्सने गोलंदाज स्टीफन पेरीच्या एकाच ओव्हरमध्ये ६ षटकार खेचण्याचाही कारनामाही या सामन्यात केलाय.
व्यवसायिक क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या फलंदाजाने केलेली ही शतकी खेळी सर्वात जलद असल्याची मानली जात आहे. जॅक्सने फेब्रुवारीत इंग्लंड लायन्सकडून खेळताना भारविरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात ६३ धावांती खेळी केली होती.