लंडन - इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने प्रशिक्षण सुरू केले आहे. मैदानात परतल्याचा आनंद झाला असल्याचेही अँडरसन म्हणाला. अँडरसनने सोमवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तो ओल्ड ट्रॅफर्ड येथे धावताना आणि गोलंदाजी करताना दिसून येत आहे.
इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज सरावात परतला...पाहा व्हिडिओ - james anderson bowling news
"मला या जागेची खूप आठवण आली. मला हळू हळू गोष्टी करण्याची सवय होत आहे, पण परत आल्याचा मला आनंद आहे", असे अँडरसनने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. गेल्या आठवड्यापासून इंग्लंडच्या खेळाडूंनी प्रशिक्षण सुरू केले आहे. कोरोनाव्हायरसमुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट उपक्रम रखडले आहेत.
"मला या जागेची खूप आठवण आली. मला हळू हळू गोष्टी करण्याची सवय होत आहे, पण परत आल्याचा मला आनंद आहे", असे अँडरसनने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. गेल्या आठवड्यापासून इंग्लंडच्या खेळाडूंनी प्रशिक्षण सुरू केले आहे. कोरोनाव्हायरसमुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट उपक्रम रखडले आहेत. इंग्लंडने जुलैपासून क्रिकेट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी आपल्या खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षणासाठी परवानगी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड गुरुवारी प्रशिक्षणात परतला. ब्रॉडने ट्रेंट ब्रिज स्टेडियममध्ये सराव केला. या सरावादरम्यानचा एक व्हिडिओ ब्रॉडने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.