मॅनचेस्टर - भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर २०२१ रॉयल लंडन कपमध्ये इंग्लंडचा काउंटी संघ लंकाशायरकडून खेळताना पाहायला मिळणार आहे. त्याने लंकाशायर क्लबशी करार केला आहे.
लंकाशायर क्लबने या संदर्भात ट्विट केले आहे. यात त्यांनी, २०२१ रॉयल लंडन कपसाठी विदेशी खेळाडू म्हणून भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरशी करार केल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत असल्याचे म्हटलं आहे.
क्लबने सांगितलं की, 'भारतासाठी २१ एकदिवसीय आणि २९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला श्रेयस ५० षटकाच्या मालिकेसाठी ओल्ड ट्रॅफर्डला येणार आहे. तो स्पर्धेला सुरूवात होण्याआधी १५ जुलैला येथे पोहोचेल. तो संघासोबत एक महिना राहिलं.'
लंकाशायरचे पदाधिकारी पॉल अलॉट यांनी सांगितलं की, 'श्रेयस नव्या पिढीचा भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा आहे.'