नवी दिल्ली -२०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेत्या इंग्लंड संघाचा कर्णधार इयान मॉर्गनला ईएसपीएनक्रिकइन्फोने वर्षाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवडले आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला पराभूत करून आपले पहिले विश्वविजेतेपद जिंकले होते.
हेही वाचा -असा गोलंदाज तुम्हाला शोधून सापडणार नाही!...पाहा मजेशीर व्हिडिओ
या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताच्या तीन फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीची 'वनडे बॉलिंग परफॉर्मन्स ऑफ द इयर'साठी निवड झाली आहे. तसेच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची वर्षातील सर्वोत्तम पदार्पणवीर म्हणून निवड झाली आहे.
महिला क्रिकेटविश्वात मेग लेनिंग आणि एलिस पेरी (दोन्ही ऑस्ट्रेलिया) यांनी वर्षातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाचा पुरस्कार जिंकला आहे.