मँचेस्टर - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना यजमान संघाने जिंकत मालिकेत १-१ने बरोबरी साधली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर गोलंदाजी करत संघाला २४ धावांनी विजय मिळवून दिला. या सामन्यात कांगारूंचा कर्णधार आरोन फिंचने ७३ धावांची खेळी करत संघाला विजयासमीप नेले खरे, मात्र इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने त्याला माघारी धाडले.
वोक्सच्या भन्नाट गोलंदाजीवर फिंचची दांडी गुल!...पाहा व्हिडिओ
इंग्लंडला २३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना फिंच आणि लाबुशेन यांनी भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. शतकाकडे कूच करणाऱ्या फिंचचा वोक्सने त्रिफळा उडवला.
इंग्लंडला २३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना फिंच आणि लाबुशेन यांनी भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.लाबुशेनसोबत भागीदारीदरम्यान फिंचने आपले अर्धशतकही झळकावले. मात्र शतकाकडे कूच करणाऱ्या फिंचला वोक्सने टाकलेला एक चेंडू कळलाच नाही. वोक्सने या चेंडूवर फिंचचा त्रिफळा उडवला. पाहा व्हिडिओ -
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे पसंत केले. त्यांनी जो रुट (३९), कर्णधार मॉर्गन (४२), टॉम करन (३७) आणि आदिल रशिद (३५) यांच्या कामगिरीच्या जोरावर ९ बाद २३२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ २०७ धावांवर ऑलआऊट झाला. १० षटकात ३४ धावा देऊन ३ बळी टिपणारा इंग्लंडचा जोफ्रा आर्चर सामनावीर ठरला.