वेलिंग्टन -मॅडी विलियर्सच्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंड महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंड महिला संघाचा ३२ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने न्यूझीलंडचा मालिकेत ३-० ने धुव्वा उडवला.
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा इंग्लंडने २० षटकात ९ बाद १२८ धावा केल्या. फ्रान्स विलसन हिने नाबाद ३१ धावांची खेळी केली. तर सोफिया डंकले (२६), टॅमी ब्यूमोंटने १४ धावा जमवल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डिवाइनने तीन विकेट घेतल्या. तर केसपर्क, रोजमॅरी, अमेलिया आणि ब्रूक हालीडे यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.