लंडन -महिला क्रिकेटपटू आणि इंग्लंडच्या संघाची यष्टीरक्षक फलंदाज सारा टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २००६ मध्ये इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या साराने वयाच्या ३० व्या वर्षी आपली निवृत्तीची घोषणा केली आहे.
हेही वाचा -मोठी बातमी : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मोहम्मद अझरूद्दीन
आरोग्याच्या कारणावरून साराने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी साराने एका आरोग्यासंबधित अभियानाचा भाग म्हणून स्वत:चा एक न्यूड फोटो शेअर केला होता. या फोटोवरून ती फार चर्चेत आली होती. साराने तिच्या कारकिर्दीत इंग्लंडकडून १० कसोटी, १२६ एकदिवसीय आणि ९० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
साराने या १३ वर्षाच्या कारकिर्दीत ६५५३ धावा करताना एकूण ७ शतके आणि ३६ अर्धशतके लगावली आहेत. 'हा निर्णय घेणे अवघड होते, परंतु निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे', असे निवृत्तीची घोषणा करताना साराने सांगितले. महिला क्रिकेटपटूंमध्ये एक हुशार यष्टीरक्षक आणि धोनीसारखी विकेटकिपींग स्टाईल प्रकार म्हणून साराचा नावलौकिक होता.