महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंग्लंड-वेस्ट इंडीज मालिकेचे बदलले नाव, 'या' दोन दिग्गज क्रिकेटपटूंचा होणार सन्मान - england vs windies series name

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि क्रिकेट वेस्ट इंडीज यांनी संयुक्त निवेदनात ही घोषणा केली. ईसीबीने म्हटले आहे की, "इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका आता 'रिचडर्स-बोथम मालिका' नावाने ओळखली जाईल. मैदानावरील मैत्री आणि मैत्रीमुळे दोन्ही संघांमध्ये जवळचे संबंध व परस्पर आदर निर्माण होईल. या दोन महान खेळाडूंचा हा सन्मान असेल.''

England west indies test series will now be known as richders botham series
इंग्लंड-वेस्ट इंडीज मालिकेचे बदलले नाव, 'या' दोन दिग्गज क्रिकेटपटूंचा होणार सन्मान

By

Published : Jul 24, 2020, 2:40 PM IST

मँचेस्टर - इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका आता 'रिचडर्स-बोथम मालिका' नावाने ओळखली जाणार आहे. सध्या ही मालिका 'विस्डेन ट्रॉफी' नावाने खेळवली जाते. त्यामुळे दोन्ही संघांमधील खेळवण्यात येणारा तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना 'विस्डेन ट्रॉफी'चा शेवटचा सामना असेल.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि क्रिकेट वेस्ट इंडीज यांनी संयुक्त निवेदनात ही घोषणा केली. ईसीबीने म्हटले आहे की, "इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका आता 'रिचडर्स-बोथम मालिका' नावाने ओळखली जाईल. मैदानावरील मैत्री आणि मैत्रीमुळे दोन्ही संघांमध्ये जवळचे संबंध व परस्पर आदर निर्माण होईल. या दोन महान खेळाडूंचा हा सन्मान असेल.''

मैदानात कठोर प्रतिस्पर्धी आणि मैदानाबाहेरील जवळचे मित्र असलेले हे दोन खेळाडू यांच्यातील संबंध साजरा करण्याचा एक चांगला मार्ग असेल, असे बोर्ड म्हणाले. सर व्हिव्हियन रिचडर्स यांनी 121 कसोटी सामन्यांमध्ये 24 शतकांसह 8540 धावा केल्या. तर सर इयान बोथम यांनी 102 कसोटी सामन्यात 5200 धावा करत 383 बळी घेतले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details