साऊथम्प्टन -जॅक क्रॉले (नाबाद १७१) आणि जोस बटलर (नाबाद ८७) यांच्या फलंदाजीसमोर इंग्लंडच्या गोलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानने ४ बाद ३३२ धावा केल्या आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे.
ENGvsPAK : तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची दमदार सुरुवात - england vs pakistan test news
नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रोरी बर्न्स अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. डॉम सिब्लेही २२ धावांचे योगदान देऊन बाद झाला. या दोघानंतर आलेल्या जॅक क्रॉलेने संघाची कमान आपल्या हातात घेतली. जॅकने आपल्या कारकिर्दीचे पहिले शतक झळकावले. त्याने नाबाद १७१ धावा करताना १९ चौकार लगावले.

कर्णधार जो रूटलाही (२९) मोठी कामगिरी करता आली नाही. जोस बटलरने ९ चौकार आणि २ षटकारांसह ८७ धावा केल्या. क्रॉले आणि बटलर यांनी पाचव्या विकेटसाठी २०५ धावांची मजबूत भागीदारी रचली. पाकिस्तानकडून यासीर शाहने २, तर शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाहने प्रत्येकी एक बळी घेतला.