साउथम्प्टन - इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात एजेस बाऊल येथे खेळवण्यात आलेला दुसरा कसोटी सामना अनिर्णीत सुटला आहे. सामन्याच्या चारही दिवस पावसाने हजेरी नोंदवली. तर, पाचव्या दिवशी मैदान ओले झाल्यामुळे दोन सत्रानंतर खेळ सुरू झाला. इंग्लंडने सामना बरोबरी सुटण्यापूर्वी, आपल्या पहिल्या डावात ४ गडी गमावून ११० धावा केल्या. जॅक क्रॉलेने अर्धशतक झळकावले. पाकिस्तानकडून मोहम्मद अब्बासने दोन गडी बाद केले. इंग्लंडने या मालिकेतील आघाडी कायम राखली आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी अनिर्णीत - england vs pakistan match report
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २३६ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने १३९ चेंडूत सात चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्याशिवाय आबिद अलीने ६०, बाबर आझमने ४७ आणि कर्णधार अझर अलीने २० धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने ४, जेम्स अँडरसनने ३ आणि सॅम करन आणि ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान १-० ने पिछाडीवर आहे. दहा वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याच्या उद्देशाने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे.