साउथम्प्टन -इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसर्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ पाऊस आणि अंधूक प्रकाशामुळे थांबवण्यात आला. फॉलोऑनचा भार सोसत असलेल्या पाकिस्तान संघाने दिवसअखेर २ बाद १०० धावा केल्या आहेत. दिवसभरात फक्त ५६ षटके खेळवण्यात आली. पाकिस्तानचा संघ अद्याप २१० धावांनी मागे असून खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानकडून कर्णधार अझर अली २ चौकारांसह २९ तर बाबर आझम ४ धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने आणि स्टुअर्ट ब्रॉडने प्रत्येकी एक बळी बाद केला.
अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला, पाकिस्तान २१० धावांनी पिछाडीवर
तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान १-०ने पिछाडीवर आहे. दहा वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याच्या उद्देशाने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ८ बाद ५८३ धावा केल्या आहेत. या डावात इंग्लंडकडून जॅल क्रॉलेने २६७ तर, जोस बटलरने १५२ धावांची दमदार खेळी केली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात २७३ धावा करू शकला. या डावात अझर अलीने २१ चौकारांच्या मदतीने २७२ चेंडूत नाबाद १४१ धावा फटकावल्या. याशिवाय त्याने सहाव्या विकेटसाठी मोहम्मद रिझवानसोबत (५३) १३८ धावांची भागीदारी रचली. तर, इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ५६ धावा देऊन ५ बळी घेतले.
तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान १-०ने पिछाडीवर आहे. दहा वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याच्या उद्देशाने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे.