मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे. उभय संघातील मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत. या निमित्ताने आपण दोन्ही संघांची एकमेकांसमोर आतापर्यंतची कसोटी मालिकेत कशी कामगिरी राहिली आहे, हे पाहणार आहोत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण ३३ कसोटी मालिका खेळण्यात आल्या आहेत. यात इंग्लंड संघाने १९ मालिकेत भारताचा पराभव केला आहे. तर १० मालिकेत भारतालाविजय मिळवता आला आहे.
उभय संघात आतापर्यंत एकूण १२२ कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. यापैकी ४७ सामने हे इंग्लंडने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने २६ सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. तसेच ४९ सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
भारत आणि इंग्लंड चेन्नईमध्ये ९ वेळा आमनेसामने झाले आहेत. यात ५ सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केले आहे. तर इंग्लंडने ३ सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित १ सामना हा अनिर्णित राहिला आहे.
असे आहे भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक –
पहिला कसोटी सामना – ५ ते ९ फेब्रुवारी – चेन्नई (भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० मिनिटांनी)