मुंबई - ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत यजमान संघाचा २-१ ने धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघासमोर आता इंग्लंडचे आव्हान आहे. पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. उभय संघात पाच फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या २ कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात हार्दिक पांड्या आणि इशांत शर्मा यांचे कसोटी पुनरागमन झाले आहे. तर अक्षर पटेल याला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
इंग्लंडचा संघ या दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहेत. यातील दोन कसोटी सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-२० मालिका अहमदाबाद तर एकदिवसीय मालिका पुण्यात खेळवली जाणार आहे. जाणून घ्या, भारत-इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक....