मुंबई -बीसीसीआयने गुरुवारी इंग्लंडच्या भारत दौर्याचे वेळापत्रक जाहीर केले. तिसर्या आणि चौथ्या कसोटी सामन्यांच्या आयोजनाबरोबरच मोटेरा स्टेडियम दोन्ही संघांमधील पाच सामन्यांची टी-२० मालिकादेखील आयोजित करेल. या सरदार पटेल स्टेडियमची क्षमता १ लाख प्रेक्षकांची क्षमता आहे.
इंग्लंडचा संघ २०२०मध्ये भारत दौऱ्यावर येणार होता. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता हा दौरा पुढे ढकलण्यात आला. कोरोनानंतर प्रथमच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होतील. यंदा आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात आले होते.
हेही वाचा -तब्बल १४ वर्षांनंतर आफ्रिकेचा संघ करणार पाकिस्तान दौरा!