महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी जे घडले नाही ते ऑगस्टच्या पहिल्या दिवशी घडणार - name and numbers on test cricket jersey

एक ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच पांढऱया जर्सीवर खेळाडूंची नावे आणि क्रमांक पाहायला मिळणार आहे.

यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये जे घडले नाही ते ऑगस्टच्या पहिल्या दिवशी घडणार

By

Published : Jul 23, 2019, 7:31 PM IST

लंडन -यंदाचा आयसीसी विश्वकरंडक आपल्या नावावर केल्यानंतर इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेल मालिकेसाठी सज्ज झाला आहे. अॅशेस ही कसोटी क्रिकेटमधील महत्वाची मालिका मानली जाते. या ऐतिहासिक मालिकेचे साक्षीदार होण्यासाठी अनेक लोकं आतुरलेले असतात. यंदा होणाऱ्या या अॅशेस मालिकेत असे घडणार आहे जे यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये कधीच घडले नव्हते.

एक ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच पांढऱ्या जर्सीवर खेळाडूंची नावे आणि क्रमांक पाहायला मिळणार आहे. इंग्लंडने त्यांच्या ट्विटर हँडलवरून याची अधिकृत घोषणाही केली आहे. सोबत, आपल्या संघातील खेळाडूंचा नवीन जर्सीतील लूक सोशल मीडियावर जाहीर केला आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या जर्सीवर हा बदल करण्यात येणार आहे.

अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाते. 1 ऑगस्टला या दोन संघांमध्ये एजबस्टनमध्ये पहिला सामना रंगणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details