लीड्स -हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जाणाऱ्या इंग्लड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दिवस अखेर इंग्लडची ३ बाद १५६ धावा अशी स्थिती आहे. जो रुटने केलेल्या नाबाद ७५ धावांच्या जोरावर इंग्लंडने सामन्यावरील वर्चस्व राखले. इंग्लडला हा सामना जिंकण्यासाठी आणखी २०३ धावांची आवश्यकता असून जो रुट मैदानात टिकून आहे.
...अन् अॅशेसमध्ये स्टुअर्ट ब्रॉड स्टम्प माईकशी बोलू लागला - थर्ड अंपायर
या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना एक विचित्र घटना घडली. स्मिथबदली संधी मिळालेल्या मार्नस लाबूशेनने दुसऱ्या डावात ८० धावा करत ऑस्ट्रेलियाला डावाला आकार दिला. तो फलंदाजी करत असताना इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने त्याला बाऊन्सर टाकला. ब्रॉडने टाकलेला चेंडू लाबूशेनच्या हेल्मेटला लागून चौकार गेला. तेव्हा त्या चार धावा अंपायरने लाबूशेनच्या खात्यात जोडल्या. ते पाहून ब्रॉडने थर्ड अंपायरला स्टंप माईकद्वारे या चार धावा मागे घेण्याची विनंती केली. ब्रॉडचे हे स्टम्प माईकशी झालेले बोलणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २४६ धावा करत इंग्लडसमोर ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लडची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या १५ धावांमध्ये रोरी बर्न्स आणि जेसन रॉय बाद झाले होते.