महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंग्लंडचा फिरकीपटू म्हणतो, ''मला त्यावेळी कोरोनासारखी लक्षणे जाणवली'' - corona symptoms to jack leach

लीच म्हणाला, ''दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात मला माझ्यात कोरोनासारखी लक्षणे आढळली होती. आता चाचणी केल्यावर ही लक्षणे परत जाणवली तर ती कोरोनाची असणार. पण आता मी निरोगी आणि तंदुरुस्त आहे."

England spinner jack leach admitted that he exhibited corona symptoms during africa tour
इंग्लंडचा फिरकीपटू म्हणतो, ''मला त्यावेळी कोरोनासारखी लक्षणे जाणवली''

By

Published : Jun 29, 2020, 9:28 PM IST

लंडन - दक्षिण आफ्रिका दौर्‍यादरम्यान कोरोनासारखी लक्षणे जाणवली असल्याचे इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचने कबूल केले आहे. लीच हा दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर डिसेंबर आणि जानेवारीत झालेल्या कसोटी मालिकेचा भाग होता. परंतु सेप्सिसचा त्रास होत असल्याने त्याला तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी त्याला मायदेशी परतावे लागले.

लीच म्हणाला, ''दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात मला माझ्यात कोरोनासारखी लक्षणे आढळली होती. आता चाचणी केल्यावर ही लक्षणे परत जाणवली तर ती कोरोनाची असणार. पण आता मी निरोगी आणि तंदुरुस्त आहे."

लीच हा 8 जुलैपासून वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड संघाचा एक भाग आहे. 29 वर्षीय लीचने सांगितले, की तो वयाच्या 14 व्या वर्षापासून क्रोन रोगाने ग्रस्त आहे आणि त्यासाठी त्याने औषधे घेतली होती.

तो म्हणाला, "माझा हा रोग नियंत्रणात आहे. हे माझ्यासाठी खूप चांगले आहे. आता मी निरोगी आणि तंदुरुस्त आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details