नवी दिल्ली -यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भुषवणारा इंग्लंडचा संघ आयसीसी विश्वचषक-२०१९ च्या स्पर्धेत नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आज इंग्लंड क्रिकेट मंडळाकडून (ECB) आपल्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी कर्णधार ईऑन मॉर्गन, मोईन अली आणि जॉनी बेअरस्टो यांचा नव्या जर्सीतला फोटो इंग्लंडकडून शेयर करण्यात आला आहे.
विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडचा संघ दिसणार नव्या जर्सीत - ICC
विश्वचषक स्पर्धेला ३० मेपासून सुरुवात होणार असून यजमान इंग्लंडचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे
इंग्लंडच्या संघाने आपल्या जर्सीसाठी स्काय ब्लू रंगाचा वापर केलेला आहे. विश्वचषक स्पर्धेला ३० मेपासून सुरुवात होणार असून यजमान इंग्लंडचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. स्पर्धेपूर्वी क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी इंग्लंडच्या संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले आहे. इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत १९७९, १९८७ आणि १९९२ या साली विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. मात्र एकदाही इंग्लंडला विश्वचषक जिंकण्यात यश आलेले नाही.
विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ
- ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.