बर्मिंगहॅम- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लडने कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून विजय मिळवला. या दमदार विजयासह इंग्लडने अंतिम फेरी गाठली. दरम्यान, इंग्लडला विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी तब्बल २७ वर्ष लागले. याची आकडेवारी सांगायची झाल्यास इंग्लडचा संघ ३२७ महिन्यांनी तर दिवसानुसार सांगायचे झाल्यास ९९६९ दिवसांनी अंतिम फेरीत पोहोचला आहे.
इंग्लडचा संघ तब्बल ९९६९ दिवसांनी पोहोचला अंतिम फेरीत - england
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लडने कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून विजय मिळवला. या दमदार विजयासह इंग्लडने अंतिम फेरी गाठली. दरम्यान, इंग्लडला विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी तब्बल २७ वर्ष लागले. याची आकडेवारी सांगायची झाल्यास इंग्लंडचा संघ ३२७ महिन्यांनी तर दिवसानुसार सांगायचे झाल्यास ९९६९ दिवसांनी अंतिम फेरीत पोहोचला आहे.
इंग्लडचा संघ १९९२ साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तो दिवस होता बुधवार २५ मार्च १९९२. मेलबर्नमध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात इंग्लड विरुध्द पाकिस्तान अशी लढत झाली. या लढतीत पाकिस्तानने इंग्लंडचा २२ धावांनी पराभव केला होता. यानंतर इंग्लडने तब्बल २७ वर्षानंतर विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
आता अंतिम फेरीत इंग्लडची गाठ न्यूझीलंडशी होणार आहे. रविवारी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामना रंगणार आहे.