मँचेस्टर - वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत इंग्लंडने 269 धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयाचा खरा नायक ठरला वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 6 तर दुसऱ्या डावात 4 बळी घेत विंडीजच्या डावाला खिंडार पाडले. या कामगिरीसह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
ब्रॉडने कसोटी कारकिर्दीत 500 बळी घेण्याचा टप्पा पार केला. असा विक्रम करणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला. तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. ब्रॉडच्या नावावर आता 140 कसोटी सामन्यामध्ये बळी जमा आहेत.