लंडन -२०२०च्या पहिल्या दिवशी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दुबईमध्ये अभिनेत्री नताशा स्टानकोविचसोबत साखरपुडा केला होता. आता यावर्षीही एका क्रिकेटपटूने साखरपुडा करत नववर्षाचे जोरदार स्वागत केले आहे. इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केला आहे.
हेही वाचा - रैनाने सोडले मौन, 'या' कारणासाठी आयपीएलमधून घेतली माघार
स्टुअर्ट ब्रॉडने मॉडेल आणि गायिका मोली किंगसोबत साखरपुडा केला. या दोघांनी सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या साखरपुड्याची घोषणा केली. ब्रॉडने मोली किंगचे चुंबन घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ''२०२१ हे योग्य पद्धतीने सुरू'', असे ब्रॉडने लिहिले. त्यावर मोली म्हणाली, ''एक हजारवेळा हो, माझा अजूनही विश्वास बसत नाही. नव्या वर्षाची जादुई सुरुवात. तुझ्यासोबत पुढचे वर्ष घालवण्यासाठी आता थांबू शकत नाही.''