केपटाऊन - इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला ३ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. या सामन्यासाठी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यापैकी एकाला संघातून वगळण्यात यावं, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसनने व्यक्त केले आहे.
उभय संघात कसोटी मालिका खेळवण्यात येत असून पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका संघाने १०७ धावांनी जिंकला आहे. दुसरा सामना केपटाऊनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात ब्राँड किंवा अँडरसन यापैकी एकाचा समावेश करावा आणि एक अतिरिक्त फलंदाज संघात घ्यायला हवे, असे पीटरसनला वाटते.