वायनाड- इंग्लंड लॉयन्सने भारत 'अ' संघाविरुद्ध खेळताना पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३०३ धावा केल्या. भारत 'अ' संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीचा फलंदाज बेन डकेट (८०) आणि मॅक्स होल्डेनने (२६) पहिल्या गड्यासाठी २३.३ षटकात ८२ धावांची सलामी दिली. नवदीप सैनीने होल्डेनला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सॅम हेन ने डकेट सोबत ४४ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने डकेटच्या दांड्या गुल करत ही भागीदारी फोडली.
पहिल्या दिवसअखेर इंग्लंड लॉयन्सच्या ५ बाद ३०३ धावा - भारत अ
नवदीप सैनीने होल्डेनला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सॅम हेन ने डकेट सोबत ४४ धावांची भागीदारी केली.
इंग्लंड लॉयन्स
डकेटने ११८ चेंडूचा सामना करत १५ चौकार मारले. ओलिवर पोप (८) आणि कर्णधार सॅम बिलिंग्स हे खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकले नाहीत. हेनने मात्र, दुसरीकडे एक बाजू लावून धरली. जलज सक्सेनाने हेनला ६१ धावांवर बाद करत त्याचा खेळ संपविला. स्टीवन मुलानी (६१) आणि विल जॅक(४०) यांनी सहाव्या गड्यासाठी ६५ धावांची खेळी केली. भारत 'अ' संघाकडून नवदीप सैनीने ५७ धावा देत २ गडी बाद केले. तर शार्दूल ठाकूर, जलज सक्सेना आणि आवेश खान यांना एक गडी बाद करण्यात यश आले.