महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ENGvsWI 1st Test : चौथ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 170 धावांची आघाडी - eng vs wi 4rth day

कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद होते. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील कसोटी मालिकेतून क्रिकेट परतले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना बुधवारपासून सुरू झाला. तथापि, कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही बदल केले आहेत, त्यानुसार ही मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवली जात आहे.

England have a lead of just 170 runs in first test against west indies
ENGvsWI 1st Test : चौथ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 170 धावांची आघाडी

By

Published : Jul 12, 2020, 12:37 PM IST

साउथम्प्टन - वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दुसर्‍या डावात 8 बाद 284 धावा केल्या आहेत. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 170 धावांची आघाडी आहे.

इंग्लंडने एजेस बाउलवर 15 धावांपुढे खेळायला सुरुवात केली. सकाळच्या सत्रात इंग्लंडने संथगतीने फलंदाजी केली. या सत्रात त्यांना 30 षटकात केवळ 64 धावा करता आल्या. दुसर्‍या सत्रात, डॉम सिब्ले कसोटी क्रिकेटमधील दुसरे अर्धशतक गाठल्यानंतर लवकरच बाद झाला. त्याने 50 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या जो डेन्लीने 29 धावा केल्या. त्यानंतर, कर्णधार बेन स्टोक्सने सहा चौकारांसह 46 धावा केल्या. होल्डरने स्टोक्सला बाद केले. त्यानंतर, जोस बटलरने अल्झारी जोसेफला नऊ धावांवर बाद केले. खेळ थांबला तेव्हा जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड खेळत होते. वेस्ट इंडिजकडून शेनन गॅब्रिएलने तीन गडी बाद केले तर पहिल्या डावात सहा विकेट घेणाऱ्या होल्डरला एक विकेट मिळाला. रोस्टन चेस आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद होते. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील कसोटी मालिकेतून क्रिकेट परतले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना बुधवारपासून सुरू झाला. तथापि, कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही बदल केले आहेत, त्यानुसार ही मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवली जात आहे.

संक्षिप्त धावफलक -

नाणेफेक - इंग्लंड (फलंदाजी)

इंग्लंड पहिला डाव - सर्वबाद 204

वेस्ट इंडिज पहिला डाव - सर्वबाद 318

इंग्लंड दुसरा डाव - 284/8 (चौथ्या दिवसअखेर)

ABOUT THE AUTHOR

...view details